Homeइचलकरंजीइचलकरंजीत एकाच दिवशी गणेश आगमन – विसर्जन मिरवणूक काढण्याच्या निर्णयास ठाकरेसेनेचा विरोध?

इचलकरंजीत एकाच दिवशी गणेश आगमन – विसर्जन मिरवणूक काढण्याच्या निर्णयास ठाकरेसेनेचा विरोध?

इचलकरंजी शहरात यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी काढण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. (Ichalkaranji) मंडळांच्या मागण्या आणि परंपरेचा विचार करून आगमन आणि विसर्जन मिरवणुकांसाठी स्वतंत्र दिवस निश्चित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. गणेशोत्सव हा शहरातील नागरिकांसाठी आणि गणेश मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मोठे महत्त्व आहे.(Ichalkaranji) त्यामुळे दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी काढण्याचा निर्णय योग्य नसल्याची भूमिका चौगुले यांनी मांडली.यंदाच्या गणेशोत्सवासाठी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमन तसेच विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी काढण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे गणेश मंडळांसमोर नियोजनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता ठाकरेसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे

 

मंडळांना त्यांच्या मागणीनुसार स्वतंत्र दिवशी गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संजय चौगुले यांनी केली. प्रशासनाने गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सर्वांना मान्य होईल असा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Ichalkaranji) दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि मिरवणुकांचे नियोजन यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, आगमन आणि विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी घेण्याच्या निर्णयावरून आता विरोधाचा सूर उमटल्याने प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -