Homeइचलकरंजीएअरजेट लूम आठवड्यातून २४ तास बंद राहणार एअरजेट लूम कारखानदारांच्या बैठकीत निर्णय

एअरजेट लूम आठवड्यातून २४ तास बंद राहणार एअरजेट लूम कारखानदारांच्या बैठकीत निर्णय

वस्त्रोद्योगातील मंदीचा फटका एअरजेट लूम कापड उत्पाद‌नालाही बसत असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने शहर व परिसरातील सर्वच एअरजेट लूम कारखाने आठवड्यातून एकदिवस संपूर्ण २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या एअरजेट लूम कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी

 

एअरजेट लूम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा पाटील होते.

 

काही महिन्यांपासून वस्त्रोद्योगात निर्माण झालेल्या मंदीचा एअरजेट लूम उत्पादनावरसुध्दा परिणाम होऊ लागला आहे. या परिस्थितीवर विचारविनिमय व सविस्तर चर्चा करण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील एअरजेट लूम कारखानदारांची शुक्रवारी रोटरी क्लब येथे बैठक झाली.

 

या बैठकीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात

 

करण्यासंदर्भात विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये उपस्थितीत कारखानदारांनी मते मांडली.

 

चर्चेअंती मंदीच्या पाश्र्वभूमीवर उत्पादन कमी करण्यासंदर्भात सर्वानुमते निर्णय झाला. त्यानुसार इचलकरंजी शहर परिसरातील सर्व एअरजेट लूम कारखाने दर सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच पूर्णतः २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -