Homeमहाराष्ट्रRBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू,...

RBI : राज्यातील ‘या’ बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँका, वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं. आरबीआयकडून वेळोवेळी त्यांच्या अधिकारांचा वापर करत बँकांना आर्थिक दंड केला जातो, तर काही बँकांवर आर्थिक निर्बंध लादले जातात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोक सहकारी बँक लिमिटेड, अहमदनगर या बँकेवर सध्या आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आरबीआयनं सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत.

 

RBI : बँकेतून पैसे काढण्यास मनाई

आरबीआयनं अशोक सहकारी बँक लिमिटेड, अहमदनगर या बँकेतून 28 ऑगस्टचं कामकाज संपल्यानंतर बचत खात्यातून, चालू खात्यातून आणि इतर ठेवींमधून पैसे आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय पैसे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. बँकेला कर्जांचं नुतनीकरण किंवा नवी कर्ज देण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. गुंतवणूक करणे किंवा नव्या ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, मालमत्तेची विक्री कर याला देखील मनाई करण्यात आली आहे. आरबीआयच्या निर्देशानुसार यासंदर्भातील कामकाज करावं, असे आदेश देण्यात आले आहेत.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सूचना देऊन देखील बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यामध्ये बँक व्यवस्थापनाकडून ठोस पावलं उचलली जात नसल्यानं अखेर ठेवीदारांच्या हितासाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशोक सहकारी बँक लिमिटेड, अहमदनगरवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

रिझर्व्ह बँकेनं या अशोक सहकारी बँक लिमिटेड, अहमदनगर या बँकेच्या ठेवीदारांच्या 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसीकडून संरक्षण मिळेल. ठेवीदारांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यासंदर्भातील अधिक माहिती घ्यावी.

 

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अशोक सहकारी बँक लिमिटेड, अहमदनगरवर निर्बंध लादले असले तरी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केलेले नाहीत. हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असतील. निर्बंधांचा कालावधी 28 ऑगस्ट 2026 पासून सुरु होईल.

 

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 27 ऑगस्टला प्रसिद्धीपत्रक जारी करत जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 50 हजार रुपयांचा दंड केला आहे. जालना जिल्हा बँकेला निश्चित कालमर्यादेत कर्जदारांची क्रेडिट संदर्भातील माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना देण्यात अपयश आलं. याशिवाय बँकेला केवायसी प्रक्रियेचे कारण देत दंड करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -