राज्यात काही भागात उष्णता वाढताना दिसत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवली. शेती पिके हातून गेली. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला. सर्वदूर पाऊस झाला नाही. आता परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालताना दिसेल. कोकण, मराठवाड्यातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, सोलापूर,बीड, धाराशिव, जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यात पावसाचा इशारा देण्यात आला. जर परतीचा पाऊस चांगला झाला तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.
परतीची पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. मात्र, यासोबतच काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मात्र, सर्वदूर पावसाची शक्यता नाही. ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि आघ्रेय बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. मॉन्सून दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश या काही भागातून माघार घेताना दिसत आहे.
राज्यासह, चंदीगड, मुझफ्फरनगर, अलीगड,उदयपूर, डीसा नलिया या भागात मॉन्सून कायम आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. ज्याचा परिणाम भारतातील मॉन्सूनवर झाला. राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पाण्याचा गंभीर प्रश्न उभा आहे. शेतीची पिके हातून केली. 2027 मध्ये तर एल निनो अधिक सक्रिय होण्याचा अंदाज आहे. जगभरातील तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, एक तर खूप पाऊस होईल किंवा अजिबात पाऊस होणार नाही.
यंदाच्या मॉन्सून हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 87 टक्के तर राज्यात 81 टक्के पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी जाहीर केली. यंदा मॉन्सूनवर एल-निनोचा प्रभाव दिसल्याचे नमूद करतानाच मॉन्सूनोत्तर हंगामात देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही आयएमडीने वर्तविली आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांबाबतही चिंता वाढली आहे. यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा एक मोठा प्रश्न आहे.
