Homeइचलकरंजीमहालक्ष्मी दर्शनासाठी इचलकरंजीतून विशेष ई-बस सेवा

महालक्ष्मी दर्शनासाठी इचलकरंजीतून विशेष ई-बस सेवा

परिवहन सभापती अरुणा बचाटे यांच्या प्रयत्नांना यश; १५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान सुविधा

इचलकरंजी, दि. १५ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत १५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान विशेष ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे इचलकरंजी शहर व परिसरातील भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

 

महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती सौ. अरुणा बचाटे यांनी या विशेष बस सेवेसाठी पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जात असल्याने त्यांना सुलभ व किफायतशीर सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.या सेवेसाठी आमदार राहुल आवाडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाची मंजुरी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची ना-हरकत मिळाली आहे. महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले.नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची प्रवासाची गैरसोय टाळण्यास या विशेष सेवेची मदत होणार आहे.इचलकरंजी शहर व परिसरातील भाविकांनी या विशेष ई-बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -