इचलकरंजी : शाहू हायस्कूलजवळील तीन बत्ती चार रस्ता परिसरातील अमन पानशॉपमध्ये अवैध मावा विक्री करताना आढळल्याने सरफराज दस्तगीर मुल्ला (वय ४२) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २२) सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कोणतेही लेबल नसलेल्या तसेच सुरक्षेबाबत वैधानिक इशारा नमूद नसलेल्या माव्याच्या १० पुड्या आढळल्या. तसेच मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन किलो बारीक सुपारीही मिळून आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ११०० रुपये आहे.याप्रकरणी पोलिस कर्मचारी तुषार भानुदास सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे . सहायक फौजदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.



