Homeमहाराष्ट्रमायक्रो फायनान्सच्या कर्जाचा डोंगर, 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन

मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा डोंगर, 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन

राज्यात दुष्काळाचे सावट असताना आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जुलमी वसुलीविरोधात संताप व्यक्त होत असतानाच परभणीतून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एका 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने मायक्रो फायनान्सच्या कर्जाला कंटाळून शेतात गळ्याला दोर लावून आपले जीवन संपवले आहे. लहू लाडाने असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मृत शेतकरी लहू लाडाने यांच्यावर खासगी मायक्रो फायनान्स कंपनीचे मोठे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेतीतील नापिकी आणि त्यातच मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा वाढता डोंगर तसेच वसुलीचा तगादा, या मानसिक ताणतणावातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

 

घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post Mortem) स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून छळवणूक झाली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्यामुळे केकरजवळा गावावर आणि संपूर्ण मानवत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -