चारचाकी वाहनातून विक्रीसाठी गोवा बनावटीचे मद्य वाहतुक करणाऱ्या एकास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. मल्लिकार्जुन शंकर पनोरी (वय ४६, रा. वेताळ पेठ, इचल.) असे त्याचे नाव आहे. पथकाने त्याच्याकडुन गोधा बनावटीचे मद्य आणि चारचाकी वाहन असा ५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जार केला आहे.
येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयावरून चारचाकी वाहन (क्र. एम एच ०९ एक्यु ३२४२) ची तपासणी केली असता गाडीत प्लास्टिक पोत्यातून गोवा बनावटीचा मद्य साठा मिळून आला, त्यामध्ये गोवा बनावटीच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या २ लिटरच्या १३ बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या २ लिटरच्या ७ बाटल्या, रॉयल स्टंग बौल सिलेक्ट व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या १२ बाटल्या, ओल्ड मंक रमच्या ७५० मिलीच्या ४ बाटल्या, रिझर्व ७ व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ९३ बाटल्यांचा समावेश आहे. त्यामुळे पथकाने मद्य वाहतुक करणारा मल्लिकार्जुन पनोरी बाला अटक करून त्याच्याकडील मद्य साठा आणि चारचाकी वाहन असा ५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाचे निरीक्षक ए.एस. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत दुय्यक निरीक्षक एस. एस. हिंगे, एस.वाय. इनामदार, एम.पी. खेत्री, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अजित बोंगाळे, मुकेश माळगे, आदित्य कोळी, सिध्दांत शेटे सहभागी झाले होते.
