Homeइचलकरंजीइचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात, १९ वर्षीय युवकाला...

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात, १९ वर्षीय युवकाला अटक

इचलकरंजी शहरातून बेपत्ता झालेल्या १३ वर्षे सहा महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश इचलकरंजी येथील बेपत्ता मुलीची गुजरातच्या भावनगर येथून सुटका आले. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या मध्यप्रदेशातील युवकाने तिला घरातून नेऊन गुजरातमधील भावनगर येथे डांबून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. (minor girl) याप्रकरणी राहुल राजू दामोर (वय १९, नवागाव, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे.

 

याबाबत मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक डॉ. आरती कणिरे या गुन्ह्याचा तपास करत होत्या. तपासादरम्यान मुलीचे लोकेशन गुजरातमधील भावनगर येथे असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून समोर आले. मध्य प्रदेशातील युवकाने इन्स्टाग्रामवरून तिच्याशी ओळख वाढवून तिला घरातून नेल्याची माहितीही तपासात पुढे आली. (minor girl) त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे भावनगर येथून मुलीला ताब्यात घेऊन तिची सुटका केली.

 

 

 

मुलीची चौकशी केली असता आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि जबरदस्तीने गुजरातमध्ये डांबून ठेवल्याचे तिने जबाबात सांगितले. (minor girl) त्यानुसार गुन्ह्यात पोक्सो कायद्याची कलमे वाढविली. आरोपी राहुल दामोर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सुटका केलेल्या मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -