Homeक्रीडाजय शाहांचं भारतीयांना गिफ्ट, वनडे वर्ल्ड कपसह चॅम्पियन्स ट्रॉफीचंही भारतात आयोजन, ICC...

जय शाहांचं भारतीयांना गिफ्ट, वनडे वर्ल्ड कपसह चॅम्पियन्स ट्रॉफीचंही भारतात आयोजन, ICC कडून तारखांची घोषणा!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2027 आणि वनडे वर्ल्ड कप 2027 ची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2027 मध्ये जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. तर 2 ऑक्टोबर 2027 पासून दक्षिण आफ्रिकेत वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.

 

2027 मध्ये या दोन मोठ्या स्पर्धांचं आयोजन होत असतानाच आयसीसीने पुढच्या 12 स्पर्धांच्या तारखांचीही घोषणा केली आहे. 2028 ते 2035 या 7 वर्षांमध्ये वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे.

 

रविवार 15 नोव्हेंबरला आयसीसीने 2028 ते 2035 या 7 वर्षांमधल्या मोठ्या स्पर्धांची घोषणा केली. 2028 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, याशिवाय आयसीसीने 2035 पर्यंतच्या वनडे वर्ल्ड कपची घोषणाही करून टाकली आहे. पण 2032 ते 2035 मध्ये 2 टी-20 वर्ल्ड कप, 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल, एक-एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कपच्या आयोजक देशाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

 

भारतामध्ये होणार वर्ल्ड कप

 

 

2028 ते 2035 मध्ये भारतात 2030 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 सालच्या वनडे वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवल्या जातील. चॅम्पियन्स ट्रॉफी 2030 चं आयोजन 9 ऑक्टोबर 2030 ते 28 ऑक्टोबर 2030 च्या दरम्यान केलं जाईल. तर वनडे वर्ल्ड कप 2031 चं आयोजन भारतामध्येच 9 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतासह बांगलादेशही सहआयोजक असेल.

आयसीसी स्पर्धांचं शेड्युल

 

आयसीसीने 2035 पर्यंतच्या स्पर्धांच्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी 2031 वनडे वर्ल्ड कपपर्यंतच्या आयोजकांचीच घोषणा केली आहे. पुढच्या काही काळात आयसीसीकडून 2032 ते 2035 पर्यंतच्या उरलेल्या 6 स्पर्धांचे आयोजक देश जाहीर केले जातील. 2028 ते 2035 या 8 वर्षांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व मोठ्या स्पर्धांपैकी कोणत्याही स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानला देण्यात आलेलं नाही. याआधी 2025 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये झाली होती, पण भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला, त्यामुळे भारताचे सामने युएईमध्ये खेळवले गेले. तर पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर झाली होती, तर टीम इंडियाने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची एक सेमी फायनल आणि फायनल पाकिस्तानमध्ये न होता युएईमध्ये झाली, त्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -