मेष: आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : गुरुकृपा लाभेल. जिद्दी व चिकाटी वाढेल.
कन्या : वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
तूळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृश्चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
धनू : वैचारिक परिवर्तन होईल. संततीचे प्रश्न मार्गी लावू शकाल
मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मीन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
