गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सोनं स्वस्त होत आहे. सोन्याचे भाव कमी होत असल्याने ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या घसरणीला आज ब्रेक लागला. आज अचानक सोन्याचे भाव वधारल्याने पुन्हा एकदा ग्राहकांचा संभ्रम वाढला आहे. दुसरीकडे सोशल मीडियात सोनं 90 ते 95 हजारापर्यंत येणार असल्याची अफवा सुरू झाली आहे. दुसरीकडे सोन्याचे भाव 10 ते 20 हजारांनी वाढणार असल्याचं जाणकार सांगत आहेत. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला आहे.
लग्नाचा सीजन आणि गुंतवणुकीच्या हेतूने बिकानेरपासून मलेशियापर्यंत अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे. 9 महिन्याच्या घाट्यानंतर सराफा व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. सोन्याचे भाव आणखी कोसळण्याच्या चर्चा सोशल मीडियात सुरू आहेत. मात्र तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सोनं 90 ते 95 हजारावर येईल ही केवळ अफवा आहे. यात काही तथ्य नाही असं गोल्ड एक्सपर्ट आणि सराफा व्यापारी अशोक सिंघल यांनी म्हटलं आहे.
सोन्याच्या दरात सध्या केवळ 4 ते 5 हजाराने घसरण झाली आहे. सोन्याचे भाव अजून 10 ते 20 हजारांनी वाढण्याची शक्यता आहे. पण ज्या लोकांनी वरच्या भावात सोनं खरेदी केलं आहे, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. त्यांनी सोनं होल्ड करून ठेवावं. ज्या लोकांना नवीन गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, असं सिंघल यांनी सांगितलं.
रशिया आणि युक्रेनच्या युद्धा दरम्यान सोन्याचे दर खूपच घसरले होते. त्यानंतर सोन्याचे भाव चार पटीने वााढले. सध्या जगभरातील बँक आणि मोठे गुंतवणूकदार सातत्याने सोनं खरेदी करत आहेत. त्यामुळे सोनं कधीच स्वस्त वा फ्रि होणार नाही, असंही ते म्हणाले. भारतीय ग्राहक नेहमीच अफवांवर विश्वास ठेवून त्यानुषंगाने कामकरतात. तेजीत आणखी तेजी येण्याची वाट पाहत असतात. तर घसरण झाल्यावर आणखी घसरण होण्याची वाट पाहतात.
एका एक्सपर्टच्या मते, सोनं आणि चांदी भाऊ बहिणीसारखे आहेत. तर तांबे सावत्र भाऊ आहे. मार्केटमधील या स्पेक्यूलेशनमध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची असून ती सामान्य नागरिकांच्या कंट्रोलच्या बाहेरची आहे. करन्सी आणि अमेरिकेच्या धोरणामुळेच सोन्या चांदीचे भाव गडगडले असल्याचं या तज्ज्ञाचं म्हणणं आहे.
