Homeमहाराष्ट्रनोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँका 5 दिवस बंद

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँका 5 दिवस बंद

महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. (Banks) अशा वेळी बँकेशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम बाकी असेल, तर आधीच तारखांचं नियोजन करून ठेवा. कारण, 23 ते 29 नोव्हेंबरदरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये एकूण पाच दिवस बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत.

 

या सुट्ट्यांचा परिणाम भारतीय स्टेट बँक (SBI), HDFC बँक, ICICI बँक, अ‍ॅक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदासह इतर सरकारी आणि खासगी बँकांच्या शाखांवर होणार आहे. मात्र, या पाचही दिवशी देशभरातील सर्वच शहरांमध्ये बँका बंद राहणार नाहीत. बँकांच्या सुट्ट्या राज्य आणि शहरानुसार वेगवेगळ्या असतात. (Banks) त्यामुळे बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी आपल्या शहरातील सुट्ट्यांच्या तारखा नक्की तपासा.

 

 

23 ते 29 नोव्हेंबरपर्यंत बँकांचे वेळापत्रक :

23 नोव्हेंबर – सोमवार – या दिवशी सेंग कुट स्नेम सण असल्याने मेघालय राज्यातील बँका पूर्ण दिवस बंद राहील. इतर राज्यातील शहरांमध्ये मात्र बँका सुरू राहतील.

24 नोव्हेंबर – मंगळवार: गुरुनानक जयंतीनिमित्त महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.

25 नोव्हेंबर – बुधवार – देशभरातील बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

26 नोव्हेंबर – गुरुवार – देशभरातील बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

27 नोव्हेंबर – शुक्रवार – या दिवशी कनकदास जयंतीनिमित्त फक्त कर्नाटक राज्यात बँकांना सुट्टी असेल बाकी इतर राज्यातील बँका नेहमीपप्रमाणे सुरू असतील.

28 नोव्हेंबर – शनिवार – या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकना सुट्टी असेल.

29 नोव्हेंबर -रविवार – देशातील सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

 

महाराष्ट्रातील बँका दरम्यान, या आठवड्यात महाराष्ट्रातील बँकांच्या शाखा तीन दिवस बंद राहणार आहेत. मंगळवार, 24 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त, शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी चौथ्या शनिवारनिमित्त आणि रविवार, 29 नोव्हेंबर रोजी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद असतील. उर्वरित चार दिवस राज्यातील बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. या सेवा 24 तास सुरू राहणार येत्या आठवड्यात बँकांना सणांमुळे सुट्टी असली तरी ग्राहकांचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबणार नाहीत. UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ATM या सुविधा नेहमीप्रमाणे वापरता येतील. (Banks) त्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे किंवा खात्यातील व्यवहार तपासणे यांसारखी कामं ऑनलाइन करता येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -