Homeइचलकरंजीअज्ञात वाहनाच्या धडकेत इचलकरंजीचा युवक ठार अन्य एकजण गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत इचलकरंजीचा युवक ठार अन्य एकजण गंभीर

इचलकरंजी-शिरदवाड रोडवर अज्ञात वाहनाने बेदरकरपणे दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील तुषार आप्पासो पाटील (वय ३९, रा. अशोकनगर, इचलकरंजी) हा जागीच ठार झाला तर संदीप आप्पाजी लोखंडे (रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) हा गंभीर जखमी झाला आहे. सदरचा अपघात रविवार रात्री दहा वाजताच्या सुमारास इचलकरंजी शिरदवाड रोडवर झाला होता.

 

संदीप लोखंडे यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची घड़क दिल्याने मोटरसायकलचे मोठे नुकसान होऊन संदीप लोखंडे हा गंभीर जखमी झाला तर मोटरसायकलवरील त्याचा मित्र तुषार पाटील जागीच ठार झाला आहे.

 

याबाबतचा गुन्हा कुरुंदवाड पोलीसात झाला असून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -