Homeमहाराष्ट्रसोने साडेतीन हजारांनी तर चांदी नऊ हजारांनी घसरली, ऐन लग्नसराईत खरेदीदारांना दिलासा

सोने साडेतीन हजारांनी तर चांदी नऊ हजारांनी घसरली, ऐन लग्नसराईत खरेदीदारांना दिलासा

सोने आणि चांदीच्या किमतीत बुधवारी मोठी घसरण झाली. 24 पॅरेट सोन्याच्या किमतीत आज 3 हजार 635 रुपयांची घसरण झाल्याने सोन्याचा दर 1 लाख 21 हजारांपर्यंत खाली आला आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतसुद्धा मोठी घसरण झाली.

 

चांदी आज 9 हजार 103 रुपयांनी स्वस्त होऊन 1 लाख 43 हजार प्रति किलो झाली आहे.

 

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. 23 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात सलग 16 दिवसांच्या घसरणीनंतर वाढ झाली होती. त्या दिवशी सोने 1.25 लाख रुपये आणि चांदी 1.53 लाख रुपये प्रति किलो होती, परंतु आज पुन्हा एकदा सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. 26 ऑक्टोबर रोजी एक तोळा सोन्याचा भाव 1 लाख 42 हजार रुपये असा होता. म्हणजेच अवघ्या महिनाभरात सोन्याची किंमत 18 हजारांपर्यंत खाली आली आहे. अमेरिकन डॉलरची पॉवर वाढल्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. तसेच अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसत आहे. व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी अन्य पर्यायाकडे वळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -