Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रविनामास्क असणाऱ्यांकडून पाच लाखांचा दंड वसूल

विनामास्क असणाऱ्यांकडून पाच लाखांचा दंड वसूल

जिल्हा पोलीस दलाकडून कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनामास्क फिरणाऱ्या जवळपास २ हजार ३४ लोकांकडून सुमारे ५ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच १२४ जणांवर ७७ गुन्हेही दाखल केले आहेत.

मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेसह प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यावर नागरिकांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यास, त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळणेकामी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दिनांक ०१ जानेवारी ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पोलीस प्रशासनाच्यावतीने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध व्यावसायिकांवर सुमारे ७७ गुन्हे दाखल केले आहेत. ज्या आस्थापना नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -