कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षी आयटी क्षेत्रात नोकरभरतीचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे. इन्फोसिसपासून विप्रोपर्यंत मोठ्या आयटी कंपन्या फ्रेशर्सना नोकऱ्या देतील.
खरं तर, डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, आयटी कंपन्या इन्फोसिस आणि विप्रो यांनी नोकरभरतीबद्दल घोषणा केली आहे. तथापि, दोन्ही कंपन्यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २६ हजार जणांना नोकरी दिली आहे.
विप्रोने पुढील वर्षापर्यंत ३० हजारांवर फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. कारण attrition rate (कंपनी सोडणाऱ्या लोकांची संख्या) २२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कंपनी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात ७० टक्के अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करेल. भारतीय आयटी कंपन्यांच्या गेल्या एका वर्षात अॅट्रिशनमध्ये वाढ होत आहे.