Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना काळात फक्त अडीच रुपयाच्या DOLO 650 गोळीने जमवला तब्बल ५६७ कोटींचा...

कोरोना काळात फक्त अडीच रुपयाच्या DOLO 650 गोळीने जमवला तब्बल ५६७ कोटींचा गल्ला !

ताप आला, डोकं दुखलं किंवा अंग दुखायला लागलं तर आपण सरळ मेडिकलमध्ये जाता आणि पॅरासिटोमोलची गोळी घेता ना? कोरोना महामारीच्या काळात तर लस टोचली की, तीच गोळी दिली जायची. साहजिक त्याचा खप जास्त असला पाहिजे हो ना? पण, तुम्ही चुकीचे आहात. कारण, मार्च 2020 पासून Dolo 650 नावाच्या गोळीची प्रचंड प्रमाणात विक्री झाली आहे. तब्बल 567 कोटींची विक्री झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जेव्हा आपण होतो, जो-तो हीच गोळी खात होता. त्यामुळे भारतीयांचा ‘आवडता स्नॅक’ या गोळीला म्हंटलं जात आहे. सोशल मीडियावर त्यासंदर्भात ट्रेंड सुरू झाला, मोठ्या प्रमाणात मिम्स बनविण्यात आले.

इतक गोळ्यांच्या तुलनेत Dolo 650 सर्वांचा भारी पडली ना राव… विक्रीचा आलेखा काढला तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर Dolo 650 आहे. त्यानंतर Calpol आणि Sumo L या गोळ्यांचा दुसऱ्या क्रमांकावर लागतो. आपल्या देशात तब्बल 37 ‘पॅरासिटोमोलचे ब्रॅण्ड’ विक्री करतात. तर पॅरासिटोमोलमध्ये Dolo 650 आणि Calpol या गोळ्या विक्रीमध्ये आघाडीवर आहेत.

बंगळुरुमध्ये असणाऱ्या मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीकडून डोलो 650 ची निर्मिती केली जाते. त्यात डाॅक्टरांकडूनही हीच गोळी मोठ्या प्रमाणावर लिहून दिली जाते. डिसेंबर 2020 मध्ये Dolo 650 गोळ्यांची विक्री 28.9 कोटी होती. 2021 मध्‍ये यामध्‍ये तुलनेत 61.45 टक्क्यांना वाढ झाली. मार्च-एप्रिल 2021 मध्ये डोलो 650 ची विक्री सर्वाेच्च झाली. ती तब्बल 48 कोटीपर्यंत विक्री झाली होती. Fepanil,[an

डाॅक्टरांकडून क्रोसिनव्यतिरिक्त डोलो 650 हे औषध जास्त प्रमाणात लिहून देत आहेत. कारण, सर्व वयोगटातील लोकांना ही गोळी चालते. त्याचबरोबर त्याचे कमीत कमी दुष्परिणाम आहेत, असं डॉक्टर आणि फार्मास्युटिकल असोसिएशनकडून सांगण्यात आलं. काही डाॅक्टर असं सांगतात की, “इतर पॅरोसिटोमोल गोळ्यांप्रमाणे डोलो 650 हादेखील एक ब्रॅण्ड आहे. ते काही वेगळे नाही. सर्व वयोगटातील लोक, हृदयविकार, किडनीचे आजार आणि मधुमेह ग्रस्त असलेले लोक ही गोळी घेऊ शकतात.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -