Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकया १० गोष्टी आरोग्या साठी लाभदायक जाणून घ्या कोणत्या आहेत

या १० गोष्टी आरोग्या साठी लाभदायक जाणून घ्या कोणत्या आहेत

ताजी बातमी ऑनलाईन टीम


१) सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते !

२) सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा . रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते !

३)दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात . पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे . अनावश्यक अति- अंब (पाणी)- पान म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेहसारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे ! दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे !

४)हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते . ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते . कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे !

५) रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते !

६) दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.

७) दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त
प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते !

८) दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे

९) रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात!

१०) सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे!
वैद्य राहुल काळे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -