Saturday, December 21, 2024
Homeआरोग्यविषयकहिवाळ्यात आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश, शरीर आतून राहील उबदार

हिवाळ्यात आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश, शरीर आतून राहील उबदार

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने आणि बाहेरील वातावरणात थंडावा असल्याने सर्दी, अंगदुखी, खोकला, खवखव अशा समस्या होणे अगदी सामान्य आहे. तसेच आपण थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपडेच घालणे आवश्यक नाही, तर त्याचबरोबर थंडीपासून आपले रक्षण करणाऱ्या गोष्टींचे सेवन करणे देखील आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात तुमच्या आहारात गरम असलेल्या अशा काही पदार्थांचा समावेश करा जे तुमचे शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत करतीलच त्याचबरोबर पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील उपयुक्त असतील, यामुळे तुम्हाला हंगामी आजारांपासून दूर राहाल.

 

ऋतू कोणताही असो, आहार पौष्टिकतेने परिपूर्ण असेल तर निरोगी आणि तंदुरुस्त राहता येते. मात्र ऋतूचे तापमान लक्षात घेऊन गरम किंवा थंड गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला हिवाळ्यात उबदार ठेवण्यास मदत करतील.

 

नट्स आणि सुका मेवा

 

हिवाळ्यात तुमच्या आहारात बदाम आणि अंजीरचा समावेश करा. या दोन्ही गोष्टी पोषक तत्वांचा चांगला स्रोत असून त्यांचा प्रभावही उष्ण असतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि शरीराला आतून उष्णता मिळेल. याशिवाय स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासोबतच योग्य पचन, वजन सांभाळणे असे अनेक फायदे होतील.

 

अळशीच्या बियांचे करा सेवन

 

थंडीच्या दिवसात तुमच्या आहारात अळशीच्या बियांचे समावेश करा. तुम्ही दररोज या बिया भाजून अर्धा किंवा एक चमचा भाजलेल्या बियांचे सेवन करा किंवा तुम्हाला आवडत असल्यास या बियांचे लाडूमध्ये समावेश करून रोज एक लाडू खाऊ शकता. याचे गरोदर महिलांनी सेवन करणे टाळा.

 

हिवाळ्यात गुळाचे सेवन करा

 

हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण कमी करून त्याऐवजी आहारात मर्यादित प्रमाणात गुळाचा समावेश करा. रोज थोडासा गूळ खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो, तसेच पचनक्रियेला फायदा होतो आणि शरीरात रक्त तयार होण्यास ही मदत होते. यात व्हिटॅमिन सी देखील थोड्या प्रमाणात असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

 

तिळाचे सेवन करा

 

थंडीच्या या दिवसात अनेक लोकं शरीर उबदार राहण्यासाठी त्यांच्या आहारात तिळाचे लाडू बनवून त्याचे रोज सेवन करतात. तिळ शरीरासाठी खूप फायदेशीर देखील आहे. तुम्ही तीळ भाजून खाऊ शकता. हे कॅल्शियम प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. मात्र ज्यांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी तीळ मर्यादित प्रमाणात खावे आणि भाजण्याऐवजी भिजवून खाणे चांगले मानले जाते.

 

आहारात या हिरव्या भाज्यांचा समावेश करा

 

हिवाळ्यात तुमच्या आहारात मेथी, चवळी आणि मोहरीच्या हिरव्या पानाची भाजी यांचा आहारात समावेश करा. या तीन हिरव्या भाज्या खायला स्वादिष्ट लागतात, याशिवाय त्यांच्या सेवनाने शरीराला आतून उष्णता मिळते आणि पोषणमूल्य वाढून रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते. हिरव्या भाज्यांमध्ये तेलमसाल्यांचा फारसा वापर होत नाही, त्यामुळे फिटनेसच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -