Saturday, December 21, 2024
Homeआरोग्यविषयकमधुमेहाच्या रुग्णांनी दुधात हा मसाला मिसळून प्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

मधुमेहाच्या रुग्णांनी दुधात हा मसाला मिसळून प्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

आज काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील होत आहे. त्यातही आजकाल मधुमेहाचा आजार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक लोकांना मधुमेह होतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मधुमेहाचा समस्या दिसत आहेत. मधुमेहाचा रुग्ण जास्त वेळ उपाशी पोटी राहिला, तर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू लागते. तेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही. आणि योग्य प्रतिसाद देत नाही. तेव्हा या प्रकारचे आजार होतात आता या परिस्थितीमध्ये नक्की काय खावे. याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

अशा स्थितीत साखरेची पातळी वाढते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे आणि आहार घेऊन तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. तथापि, काही घरगुती उपाय देखील मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात, ज्यामध्ये दालचिनी महत्त्वाची मानली जाते. दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.

 

दालचिनी साखर नियंत्रित करते. दालचिनीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. हे दूध प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते. तुम्ही इतर मार्गांनीही दालचिनीला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. मधुमेहामध्ये दालचिनी कशी काम करते?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असेही समोर आले आहे की, दालचिनीच्या सेवनाने अनियंत्रित साखरेवर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनी फायदेशीर ठरते. विशेषतः उपवासाच्या साखरेवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. काही रुग्णांना 3 महिन्यांसाठी 1 ग्रॅम दालचिनी देण्यात आली आणि त्यांच्या उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी 17 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.

 

दालचिनीचे फायदे फक्त साखरेसाठीच नाही तर दालचिनी अनेक रोगांवर गुणकारी असल्याचे सिद्ध होते. दालचिनीचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. हे वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील दालचिनीचा वापर केला जातो. यासाठी सकाळी दालचिनीचे सेवन करा. एका ग्लास पाण्यात दालचिनी रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी प्या. यामुळे तुमची मंद चयापचय क्रिया वाढेल आणि तुमचे वजनही

कमी होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -