Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यावर अवकाळी पावासाचे सावट, कोकणासह मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पडणार पाऊस!

राज्यावर अवकाळी पावासाचे सावट, कोकणासह मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पडणार पाऊस!

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे सावट आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर sयांनी सांगितले की, ‘उत्तर भारतात पश्चिमी प्रक्षोभ जाणवत असून त्यामुळे वायव्य भारतात म्हणजेच राजस्थानजवळ सिस्टिम तयार झाली आहे. त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्राकडून येणारे आद्रतायुक्त वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे. कोकण , गोवा आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी हलक्या पवासाची शक्यता आहे आणि पाऊस झाला तरी सुद्धा तो हलक्या स्वरापाचा असेल.’

22 जानेवारी रोजी पालघर, ठाणे , मुंबई , रायगड , रत्नागिरी , धुळे , नंदुरबार, जळगाव , नाशिक , अहमदनगर , पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका किंवा ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -