Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : १० लाखांची लाच उकळणारे दोन कॉन्स्टेबल जेरबंद, एसीबीची कारवाई

कोल्हापूर : १० लाखांची लाच उकळणारे दोन कॉन्स्टेबल जेरबंद, एसीबीची कारवाई

मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले. विजय केरबा कारंडे (वय 50, रा. उचगाव, ता. करवीर) आणि किरण धोंडीराम गावडे (वय 37, रा. केदार नगर मोरेवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.

पोलीस मुख्यालय कार्यालयालगत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपाध्यक्ष आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित कॉन्स्टेबल विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे, असे बुधवंत यांनी सांगितले.

पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, कोल्हापूर जिल्हा वकील पुत्राचा मोटरकार तसेच दुचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वकील पुत्राने आठ दिवसांपूर्वी पनवेल येथून जुन्या वापरातील स्पोर्ट्स बाईक खरेदी करून कोल्हापुरात आणल्या होत्या. दुचाकी भंगारमध्ये काढण्यासाठी त्यांनी रितसर परवाने घेतले होते. मात्र विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघांनी वकील पुत्राला गाठले. मुंबई, पुण्यातून दुचाकी चोरून आणून कोल्हापुरात विकतो काय असा जाब विचारत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात तुला अटक करून तुझ्यावर मोका लावतो, तुझी सार्वत्रिक बदनामी करतो अशी धमकी देऊन हे प्रकरण थांबवायचे असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा कारवाई अटळ आहे, असे त्याने धमकावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -