Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रबायकोवर बलात्कार करण्यासाठी पतीने केली मित्राला मदत

बायकोवर बलात्कार करण्यासाठी पतीने केली मित्राला मदत

हिंगोली तालुक्यातील सवड येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बायको घरात एकटी असताना खुद्द पतीनेच मित्राला घरात पाठवून पत्नीवर बलात्कार घडवून आणण्यास मदत केली आहे. हिंगोली तालुक्यातील सवड येथील घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतीसह अन्य एकाविरूद्ध पिडीत महिलेच्या तक्रारीवरून २० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सवड येथील राहत्या घरी पिडीत महिला एकटी होती. संबंधित महिलेचा पती संजय भानुदास थोरात याने त्याचा मित्र माधव जोगदंड (रा. सवड) यास घरात पाठविले.

पिडीतीने माधव जोगदंड यास प्रतिकार केला. जोगदंड याने पिडीत महिलेस व तिच्या मुलीस चाकुचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेच्या इच्छेविरूद्ध बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -