Homeमहाराष्ट्रखासगी रुग्णालयात आयुष्मान कार्ड बंद? मोफत उपचार मिळणार नाही?

खासगी रुग्णालयात आयुष्मान कार्ड बंद? मोफत उपचार मिळणार नाही?

आयुष्यमान भारत कार्ड योजना बंद झालीय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय…या योजनेच्या माध्यमातून अनेक गरजूंना मोफत उपचार मिळतात…पण, आता खासगी रुग्णालयात या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा मेसेज व्हायरल झाल्याने खळबळ उडालीय…या कार्डच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत असल्याने अनेकांना फायदा होत होता…त्यामुळे खरंच ही योजना खासगी रुग्णालयासाठी बंद झालीय का…?

 

याची आम्ही पडताळणी सुरू केली…त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात…

 

आयुष्मान कार्ड योजनेचा लाभ आता खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना घेता येणार नाही. आता ही योजना खासगी रुग्णालयांसाठी बंद करण्यात आलीय. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना धक्का बसलाय…खरंच हे कार्ड खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांसाठी बंद केलंय का…? बंद केलं असेल तर खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का…? या योजनेचा बऱ्याच जणांना आर्थिक फायदा होतो…5 लाखांपर्यंत उपचार मोफत मिळतात…त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून मिळवली…

 

डॉक्टर ओमप्रकाश शेटे, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष यांच्या माहितीनुसार केंद्र सरकारची आयुष्यमान भारत कार्ड योजना आयुष्यमान भारत कार्ड योजना बंद झालेली नाही योजना बंद झाल्याची केवळ अफवा पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात नोंदणीकृत सरकारी, खासगी रुग्णालयात कार्डद्वारे उपचार मिळतात.

 

आयुष्यमान भारत कार्ड योजना हे अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक आहे…राज्यात आणि केंद्रात ही योजना खूप यशस्वीरित्या सुरू आहे…त्यामुळे आमच्या पडताळणीत खासगी रुग्णालयात आयुष्मान कार्ड बंद झाल्याचा दावा असत्य ठरलाय…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -