कतरिना कैफ लग्नाच्या दीड महिन्यानंतर सुट्टी इन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली आहे. तिथले काही फोटो तिने शेअर केलेत. ‘या फोटोला तिने माझ्या आनंदाचं ठिकाण’, असं कॅपशन दिलं आहे. मालदीवला गेल्या आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतोय.कतरिना कैफच्या या सुट्टीत विकी कौशल तिच्यासोबत नाहीये. कारण विकी सध्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या फोटोमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. बीचवरचे वेगवेगळ्या स्टाइलमधले कॅन्डिड फोटोस तिने इन्स्टावर शेअर केलेत.लग्नानंतर कटरिना तिचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’मध्ये सलमान खानसोबत पहायला मिळेल. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.