सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. प्रमुख चार रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर केला आहे. प्लास्टिकचा वापर रस्त्यांच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे. पर्यावरण संवर्धनातील ते एक महत्त्वाचे पाऊलही आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर सुरू केल्यास जिल्ह्यात प्लास्टिक कचर्याची समस्याच शिल्लक राहणार नाही.
माझी वसुंधरा आणि आझादी का अमृतमहोत्सव’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका अनेकविध उपक्रम राबवित आहे. पर्यावरण संवर्धन, पर्यावरण पूरक उपाययोजना राबविल्या जात आहेत. रस्ते डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर हा महापालिकेचा एक आगळावेगळा आणि हटके उपक्रम ठरत आहे. राज्य शासनानेही या उपक्रमाची दखल घेतली आहे. महापालिकेचे कौतुकही केले आहे.