ही घटना आहे कपीलनगर पोलिस ठाण्या अंतर्गतची. शिवचरण यादव यांचे चहा, नाश्त्याचे दुकान आहे. या दुकानात एक पंधरा वर्षांचा मुलगा काम करत होता. या मुलाचे यादवच्या घरी जाणे होते. मुलगा हा व्यवस्थित काम करत होता. पण, त्याच्या मालकाला काही समाधान नव्हते. मुलाने महिन्याभरानंतर शिवचरणला पगार मागितला. नंतर बघून म्हणून मालकाने टाळाटाळ केली. दोन महिने झाले. पण, पगार काही मिळेना. त्यामुळं मुलगा नाराज झाला. आता केलेल्या कामाचा मोबदला कसा काढणार, असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. मुलाचे त्याच्या घरू जाणे-येणे होते. त्यामुळं घराबद्दल पूर्ण माहिती त्याला होती. मालकाच्या घरी चोरी करण्याचा बेत त्याने आखला. सव्वीस जानेवारीला मालक कुटुंबासह दुकानात आले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून मुलाने घराचा कुलूप तोडला. रोख रक्कम व दागिन्यांवर हात साफ केला. दुकानातून घरी परत आल्यावर मालकाला धक्का बसला. चोरी कशी झाली याचा तो विचार करू लागला.
सीसीटीव्ही चेक करण्यात आले. त्यामध्ये या संशयित मुलगा दिसला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अठ्ठावीस हजार रुपये रोख रक्कम वसूल करण्यात आली. तसेच सव्वा लाख रुपयांच्या दागिन्यांवर त्याने हात साफ केले होते. ही कारवाई डीसीपी मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनात शुभांगी वानखेडे, पीएआय भरत जाधव, संजय वानखेडे, अरविंद काळबांडे, आशीष सातपुते, गणेश साहुरसाखडे व अश्विन जाधव यांनी केली.