Friday, September 20, 2024
Homeराजकीय घडामोडीनितेश राणे यांना मोठा धक्का! संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडी

नितेश राणे यांना मोठा धक्का! संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर राणे यांच्या वकिलांनी जामिन प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र सरकरी पक्षाकडून नितेश राणेंना पोलिस कस्टडीची मागणी करण्यात आली असल्याचे समजते आहे.

दरम्यान या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र त्यांनी आज हा अर्ज मागे घेतला आहे. तसेच ते आता न्यायालयासमोर शरण देखील होत आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे

काय आहे प्रकरण ?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोन जणांनी आपल्यावर सशस्त्र हल्ला केला असा दावा संतोष परब यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान ही घटना घडली होती. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -