ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारताची कोकिळा… स्वरसम्राज्ञी… भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर (Lata Mangeshkar Dead) संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.
लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून लता मंगेशकर यांचा ‘प्रभूकुंज’पासून ‘शिवाजी पार्क’ असा अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. त्याचे पार्थिव अंत्यविधीसाठी रवाना झाले आहे.
लतादीदींच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर मोठा जनसागर लोटला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित झाले आहेत.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रभूकुंज निवासस्थानी जाऊन लतादीदींचे अंत्यदर्शन घेतले.