Friday, November 22, 2024
Homeराजकीय घडामोडीपैसे वाटपाच्या संशयावरून म्हापशात दोन गटांत बाचाबाची

पैसे वाटपाच्या संशयावरून म्हापशात दोन गटांत बाचाबाची

निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असतानाच सध्या राजकीय वातावरणही तापलेले आहे. त्यातच म्हापशात पैशांच्या वाटपाच्या संशयावरून बुधवारी मध्यरात्री भाजप-काँग्रेसच्या या दोन्ही राजकीय गटांत झालेल्या जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे शहरातील वातावरण वेळ तंग बनले. म्हापसा पोलिस स्थानकाबाहेर मध्यरात्री सुमारे शंभर जणांचा जमाव जमला होता. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार तथा नगरसेवक सुधीर कांदोळकर तसेच एका अज्ञाताविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक निनाद देऊळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी आपल्या सहकार्यांच्या साहाय्याने वातावरण नियंत्रणात आणले. गंगानगर-खोर्ली भागात सुधीर कांदोळकर यांनी पैसे वाटप केले असा आरोप करीत भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोंधळ घातला. हा प्रकार मंगळवारी रात्री 11.10 वाजता घडला. याची माहिती मिळताच, पोलिस व भरारी पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एका कारमध्ये खाली पाकिटांचे बंडल सापडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -