Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनबदनामीच्या खटल्याआडून जमिनीची लढाई, सलमान खानवर शेजाऱ्याचे दबंग आरोप सुरुच

बदनामीच्या खटल्याआडून जमिनीची लढाई, सलमान खानवर शेजाऱ्याचे दबंग आरोप सुरुच

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने पनवेल फार्महाऊसच्या शेजारी राहणाऱ्या केतन कक्कड यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. बुधवारी सत्र न्यायालयात या प्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. यावेळी केतन कक्कड यांच्या वकील आणि वरिष्ठ कायदेतज्ज्ञ आभा सिंह यांनी कोर्टाला सांगितले की, सलमानला केतन कक्कड यांची जमीन स्वस्तात हवी होती. जमिनीसाठी ही लढाई सुरु असल्यामुळे सलमानने मानहानीचा खटला दाखल केल्याचा आरोप कक्कडच्या वकिलांतर्फे करण्यात आला. दोन शेजार्‍यांमध्ये जमिनीबाबत वाद होता, बदनामीच्या खटल्याच्या नावाखाली ही जमिनीसाठी लढाई आहे. सलमान खानने ही याचिका स्वच्छ हेतूने न्यायालयात दाखल केली नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी असा युक्तिवाद केतन कक्कड यांच्या वकील आभा सिंह यांनी केला. आज पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -