Friday, November 22, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा ‘तो’ निर्णय वाढवणार डोकेदुखी

मुंबई इंडियन्सचा ‘तो’ निर्णय वाढवणार डोकेदुखी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आयपीएल 2022 (ipl auction 2022) साठी मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) 4 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांचा समावेश आहे.

यामध्ये पोलार्डला 6 कोटी रूपये देत मुंबईनं रिटेन (ipl auction 2022) केले आहे. पोलार्डचा फिटनेस हा काळजीचा विषय बनल्यानं मुंबईची डोकेदुखी वाढली आहे.भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये पोलार्ड फिटनेसच्या कारणामुळे खेळला नाही. पोलार्ड जखमी असल्यानं महत्त्वाची मॅच न खेळल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे.

यापूर्वी तो डिसेंबर महिन्यांत वेस्ट इंडिज टीम (smart news) पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यावर तो गेला नव्हता. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यानही पोलार्ड दुखापतीनं त्रस्त होता. त्यामुळे तो बांगलादेश विरूद्धच्या मॅचमध्ये रिटायर हर्ट झाला होता.

गेल्या काही महिन्यांपासून सतत दुखापतग्रस्त असलेल्या पोलार्डला रिटेन करत मुंबई इंडियन्स चूक केली का हा प्रश्न पडला आहे. पोलार्ड गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसोबत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -