ताजी बातमी ऑनलाईन टीम
सॅमसंगने (Galaxy Unpacked 2022) इव्हेंटमध्ये Galaxy S22 मालिकेतील स्मार्टफोन लॉन्च केले. सॅमसंगने यंदाही Galaxy S22 सीरीजचे तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra यांचा समावेश आहे. हे नवीन स्मार्टफोन्स लेटेस्ट चिपसेट आणि AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहेत.
सॅमसंगने Galaxy S22 प्लस आणि Galaxy S22 अल्ट्रा मॉडेल्ससाठी चार्जिंगचा वेग वाढवला आहे. Black, Phantom White, Green, and Burgundy या रंगात सॅमसंग स्मार्टफोनची ही नवी मालिका उपलब्ध असणार आहेत. 25 फेब्रुवारीपासून Galaxy S22 सीरीजचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे कंपनीने सांगितले.
Samsung Galaxy S22
Samsung Galaxy S22 यामध्ये 6.1 इंच FHD+ डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले, Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन, 120 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट, ब्लू लाइट कंट्रोलसाठी सॅमसंग कम्फर्ट शील्ड, 4nm प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम तसेच, फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप यामध्ये आहे. लेन्स आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेल, प्राथमिक ड्युअल पिक्सेल वाइड-अँगल सेन्सर समाविष्ट आहे आणि 10-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. हे फिचर्स आहेत.
Samsung Galaxy S22+
यामध्ये 6.6-इंचाचा फुल-HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. 12GB जीबी रॅम आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपस 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा समाविष्ट आहे. लेन्स आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस वाइड-एंगल सेन्सर तसेच 80-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 10-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
बोर्डवरील सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, ॲम्बियंट लाइट सेन्सर, बॅरोमीटर, जिओमॅग्नेटिक, गायरो स्कोप, हॉल आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश होतो. यामध्ये 4,500mAh बॅटरी आहे जी 45W वर जलद चार्जिंगला सपोर्ट करते, तर स्मार्टफोन 15W वायरलेस चार्जिंग तसेच रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी वायरलेस पॉवरशेअरला सपोर्ट करतो.
Galaxy S22 Ultra
Samsung Galaxy S22 Ultra हा S-सिरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात S Pen फोनच्या बॉडीमध्ये अंगभूत आहे. Galaxy S22 आणि Galaxy S22+ पेक्षा वेगळ्या असलेल्या Galaxy S22 Ultra मध्ये फुल-HD+ डिस्प्ले आहे. मोठा 6.8-इंचाचा Edge QHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे ज्याचा 120Hz अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे.
Galaxy Unpacked 2022 : सॅमसंगकडून तीन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च; काय आहेत फिचर्स ?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -