Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात ७० नवे रुग्ण एकाचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात ७० नवे रुग्ण एकाचा मृत्यू

ताजी बातमी ऑनलाइन टीम

जिल्ह्यात आज कोरोना बाधित आणि कोरोना बळींची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुस्कारा टाकला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ७० नवे कोरोना बाधित आढळून आले तर जिल्ह्यात ३१० जण कोरोनामुक्त झाले, दिवसभरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात जिल्ह्यात १९०७ जणांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या त्यामध्ये ७० नवे बाधित आढळून आले. या बाधितांमध्ये आजरा-२, हातकणंगले-३, कागल-२, करवीर-८, पन्हाळा२, राधानगरी-१, शाहुवाडी-१ आणि शिरोळ तालुका-४ तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात -३४, इचलकरंजी नगरपरिषद -३, जयसिंगपूर नगरपरिषद-३, कागल नगरपरिषद-१, हुपरी नगरपरिषद१ आणि अन्य जिल्ह्यातील ५ जणांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -