Friday, November 22, 2024
Homeराजकीय घडामोडीअनिल परब यांच्या वक्तव्यानं दापोलीत कदम-दळवी वाद वाढणार?

अनिल परब यांच्या वक्तव्यानं दापोलीत कदम-दळवी वाद वाढणार?

दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दापोलीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे यांची निवड झालीय. पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत हाच फॉर्म्युला राबिवण्यात येणार असल्याचे सूतोवाच आज अनिल परब यांनी केले.दापोली नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना मोठा आनंद झाला आहे. पालकमंत्री अनिल परब यांनी आगामी काळात आम्ही सूर्यकांत दळवी यांना कायम आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू, असं म्हटलं. 

दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेतृत्व माजी आमदार दळवी यांचेकडेच आगामी काळातही राहील, असे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्याने दापोली मतदार संघात पुन्हा एकदा रामदास कदम विरुद्ध सूर्यकांत दळवी असा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दापोलीमध्ये वर्चस्व कुणाचं यासाठी हे दोन्ही नेते चढाओढ करणार हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -