Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रCA परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

CA परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी जाधव ही तरुणी सीएचा अभ्यास करीत होती. त्यासाठी तिने दोन वेळा परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेस तिला अपयश आले. पल्लवीने तिसऱ्यांदा परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून निकाल जाहीर झाल्यापासून ती घरातील कोणत्याच व्यक्तीसोबत बोलत नव्हती.
आज (शुक्रवार) सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परीक्षेत पुन्हा अपयश आल्याने तिने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -