Monday, December 23, 2024
Homeनोकरीमूळ पगारावर किती मिळेल DA? जाणून घ्या

मूळ पगारावर किती मिळेल DA? जाणून घ्या

कर्मचाऱ्यांचा लवकरच महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. मार्चमध्ये होळीच्या आसपास केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार हे नक्की आहे. कोरोनामुळे दीड वर्षापासून महागाई भत्ता बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता त्यांचा महागाई भत्ता वाढत आहे. मागील वर्षी सरकारने महागाई भत्त्यात एकाच वेळी 11 टक्के वाढ केली होती.

दीड वर्षाच्या कालावधीत ही 11 टक्के स्थिर वाढ होती. मात्र, या मध्यांतराच्या थकबाकीबाबत सरकारने कोणतीही सूचना जारी केलेली नाही. पण, आता सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून केली जाणार आहे.

मार्चमध्ये घोषणा होईल
केंद्र सरकार दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै असे दोनदा महागाई भत्ता आणि महागाई मदत सुधारित करते. साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर महिन्यात याची घोषणा केली जाते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. 1 जुलै 2011 पासून सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पेन्शनवर 31 टक्के डीए मिळत आहे.
डीए 3 टक्के वाढेल यंदाही मार्च महिन्यात होळीच्या आसपास केंद्र सरकार महागाई भत्त्यात सुधारणा करणार आहे. नव्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे की, डीए 3 टक्क्यांनी वाढेल. AICPI निर्देशांकाचा नवीन डेटा जाहीर झाल्यानंतर, DA मध्ये वाढ होणे निश्चित आहे. मात्र अद्याप त्याची घोषणा झालेली नाही.

DA 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
केंद्र सरकार केव्हाही वाढीव महागाई भत्ता जाहीर करेल तेव्हा तो 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल असे मानले जाते. म्हणजे जेवढे महिने निघून जातात तितके महिने कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनाही महागाई भत्त्याची थकबाकीचा फायदा होईल. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 48 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फायदा होईल. तसेच 69 लाख सेवानिवृत्त धारकांना याचा लाभ मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -