Sunday, December 22, 2024
Homeअध्यात्म‘अति तिथे माती’ , चाणक्य नीतीच्या मते, कोणत्याही गोष्टींचा अतिरेक नकोच, नाहीतर...

‘अति तिथे माती’ , चाणक्य नीतीच्या मते, कोणत्याही गोष्टींचा अतिरेक नकोच, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

ताजी बातमी ऑनलाईन टीम
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.



चाणक्य नीतीच्या मते जीवनात कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त असू नये. गोष्टींच्या अतिरेकामुळे व्यक्तीचे नुकसान करते. उदाहरण देताना आचार्य सांगतात अति अभिमानामुळे रावणाचा अंत झाला त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका.



जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर प्रेमात ढोंगीपणा नसावा. प्रेम नेहमीच नैसर्गिक असले पाहिजे आणि प्रेमाला पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. पण प्रेमाचा अतिरेक केला तर नुकसानच होते.
पण काही प्रकरणांमध्ये कधीही मर्यादा असू नयेत . उदाहरणार्थ, व्यापाऱ्याने मर्यादेत व्यवसाय करण्याचा विचार कधीही करू नये. जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्याने व्यवसाय करावा, तरच त्याला नफा मिळू शकेल.



चाणक्य नीती प्रमाणे प्रत्येकाला आदर हवा असतो. जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करायचे असेल तर तुमच्या जोडीदारालाही तुमच्यासारखा सन्मान मिळण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवा. जे लोक आपल्या जोडीदाराला कमी महत्त्व देतात, त्यांचे नाते अनेकदा कमकुवत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -