राजकारणात शरद पवार , अजित दादा, छगन भुजबळांनी मला संधी दिली. त्या संधीचं मी सोनं केलं, असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे आभार मानले. लाड यांच्या सदस्यत्वाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. त्याबद्दल त्यांना सभागृहातून निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना त्यांचा स्वर कातर झाला. ते जुन्या आठवणीत रमलेले दिसले. खरे तर हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची खरी ओळख. त्यामुळेच विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे तिघेही वेगवेगळ्या पक्षात असून, त्यांची मैत्री आपल्याला ठाऊकय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज आणि पाणी काही वेगळचंय. त्याचीच एक चुणूक लाड यांनी बोलताना दाखवली. नेहमी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडणाऱ्या लाड यांचे एक वेगळे रूप त्या निमित्ताने सभागृहाला आणि उभ्या महाराष्ट्राला दिसले.
राजकारणात शरद पवार, अजित दादा, भुजबळांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं; भाजपच्या लाडांचा स्वर झाला कातर…!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -