पुढील महिन्यात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या मेंटरपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे M S Dhoni सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने उचललेल्या पावलाचे कौतुक होत आहे. मात्र, आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ परिषदेला महेंद्रसिंग धोनीच्या (M. S. Dhoni) नियुक्तीविरोधात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्टची तक्रार मिळाली आहे.
मध्य प्रदेश असोसिएशनचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ‘धोनीची नियुक्ती हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्ट म्हणजेच हितसंबंधांचा मुद्दा आहे.
ज्यामध्ये एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही,’ असे सांगितले. महेंद्रसिंग धोनी M. S. Dhoni आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. तसेच आता बीसीसीआयने त्याला भारतीय संघासोबत मेंटर म्हणून नियुक्त केले आहे.
यापूर्वी राहुल द्रविडने भारत ‘अ’ संघाचा कर्णधार बनण्यापूर्वी आयपीएलशी असलेले आपले नाते तोडले होते.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, हो संजीव गुप्ता यांनी बीसीसीआय प्रमुख सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी बीसीसीआयच्या घटनेच्या कलम 39 (4) चा हवाला देऊन सांगितले की, याअंतर्गत एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही.
बीसीसीआयच्या उच्च कमिटीला आता आपल्या कायदेशीर टीमकडून याबाबत सल्ला घ्यावा लागेल.
महेंद्रसिंग धोनी M S Dhoni सध्या एका टीममध्ये खेळाडू म्हणून खेळत आहे. तर, दुसरीकडे तो भारतीय संघासोबत मेंटर म्हणून रहाणार आहे.
महेंद्रसिंग धोनी याच्या नियुक्तीला आक्षेप
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -