Sunday, February 23, 2025
Homeआरोग्यसावधान! कोरोनाचे नवे 9 लक्षणं आले समोर

सावधान! कोरोनाचे नवे 9 लक्षणं आले समोर

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र भयावह (Corona Pandemic) परिस्थिती निर्माण होत सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे वाटत असताना आता कोरोनाचे (Covid-19) नवीन 9 लक्षणं ( Covid New Symptoms) समोर आली आहे. युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने (UK Health Security Agency)  कोविड-19 च्या नवीन लाक्षणांना शोध घेत त्यांची यादी जाहीर केली आहे.

घसा खवखवणे (Sore Throat), अंगदुखी (Aching Body), अतिसार (Diarrhoea)  आदी लक्षणांचा समावेश आहे. कोरोनाचे विषाणू वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असता. या परिणामांचा अभ्यास करून ही नवीन लक्षणे समोर आली आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. आपल्या देशात पूर्वीच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून परिस्थिती हळहळू पूर्व पदावर येत आहे. मात्र जगातील काही भागात जाणूनही कोरोणचा थैमान सुरू आहे. चीन, फ्रान्ससह काही देशामध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

जगातील काही भागात आता कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. ओमिक्रोननंतर आता ओमिक्रोन सब व्हेरियंट BA.2 ने चिंता वाढविली आहे. या व्हेरियंटमुळे पाश्चिमात्य देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ बघावयास मिळत आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार XE बद्दल सांगितले आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार ओमिक्रोनच्या BA. 1 आणि BA.2 या प्रकारांनी बनलेला आहे. हा प्रकार BA. 2 पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचे WHO ने सांगितले आहे. कोरोनाशी संबंधित सामान्य लक्षणांचा विचार केल्यास ताप, खोकला, थकवा, चव न समजणे या लक्षणांचा समावेश होतो. मात्र आता एनएचएस (NHS) ने सर्दी आणि फ्ल्यू हे देखील कोरोनाचे लक्षण असू शकता असा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -