Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनरकुल प्रीत सिंग बनली ‘पायलट’!

रकुल प्रीत सिंग बनली ‘पायलट’!

अमिताभ बच्चन आणि अजय देवगण अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘रनवे 34’ या आगामी चित्रपटात रकुल प्रीत सिंगनेही प्रमुख भूमिका साकारली आहे. कारकिर्दीत इतकी मोठी संधी मिळाल्याने ती अर्थातच खुश आहे. या चित्रपटात ती पायलटची भूमिका करीत आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले, ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली होती आणि त्याचवेळी माझ्या टीमकडे ही स्क्रीप्ट आली. मला ही स्क्रीप्ट आवडली आणि मी खरोखरच खुश झाले. एव्हिएशनवर अशा प्रकारचा चित्रपट आलेला नाही. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. चित्रपटातील माझी भूमिका मला ‘एक्सायटिंग’ वाटली.

अजय देवगण यांचे दिग्दर्शन आणि बच्चन सरांसमवेत काम करण्याची संधी मिळाली, यापेक्षा आणखी चांगलं काय होऊ शकतं? बच्चन सरांकडून खूप काही शिकण्यास मिळालं. या चित्रपटात मी कॅप्टन तान्याची भूमिका साकारत आहे. ही तरुण को-पायलट असते. एक हळवी तसेच मजबूत तरुणीची ही भूमिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -