ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएलचे सामने खूप चुरशीचे होत आहेत. आता सामने प्ले ऑफच्या दिशेनं जात आहेत. या सामन्यांमध्ये अनेक गमतीजमती घडत असतात. कधी मिस्ट्री गर्लची चर्चा होते. तर कधी चाहत्यांनी (love couple) आणलेल्या पोस्टरचीही चर्चा रंगते.
एका तरुणानं चक्क आयपीएलसाठी मोठा त्याग केला आहे. सध्या त्याची चर्चा सगळीकडे आहे. आपल्या (love couple) गर्लफ्रेंडसाठी सवयी किंवा एखादी गोष्ट टाळल्याचं ऐकलं असेल पण चक्क एका तरुणानं क्रिक्रेटसाठी आपल्या गर्लफ्रेंडलाच सोडल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाच्या धाडसाचं कौतुक करावं की अजून काय बोलावं असा प्रश्न तुम्हालाही काही सेकंद पडला असेल.
आयपीएलच्या सामन्यामधील एका तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आपल्याला दिसेल की तरुणाने म्हटलंय मला माझ्या गर्लफ्रेंडनं सांगितलं एकतर मी किंवा आयपीएल तू कोणाला निवडणार? मी आयपीएल निवडलं आणि म्हणून आज इथे आहे.
हा सगळा प्रकार कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यादरम्यान घडला. या तरुणाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही युजर्सनी या तरुणाच्या धाडसाचं कौतुकही केलं आहे.
याआधी देखील आयपीएलमध्ये मजेशीर पोस्टर व्हायरल झाले होते. सुहाना खानच्या एका चाहत्यानेही पोस्टर दाखवलं. त्यामध्ये मी हैदराबादला सपोर्ट करण्यासाठी आलो पण सुहानाने मला संभ्रमात टाकलं असं म्हटलं होतं. हे पोस्टर देखील चर्चेचा विषय ठरलं होतं.