Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांचा मोर्चा अयोध्येत! १ मे रोजी औरंगाबादला प्रचार सभा

राज ठाकरे यांचा मोर्चा अयोध्येत! १ मे रोजी औरंगाबादला प्रचार सभा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

ठाण्यातील मनसेची ‘उत्तर सभा’ झालेनंतर राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबाद व अयोध्याकडे वळवला आहे. राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा पार पडेल. तर ५ जून रोजी हे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली. दरम्‍यान, राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. आणि त्यांनी अवघ्या दहा मिनिटात पत्रकार परिषद आटोपली.



सुरुवातीला त्यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत सांगितले की, हा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. भारतातील मुस्लीम हे देशापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून भोंगे उतरावेच लागतील. तसेच, भोंगे काढण्याबाबत ते ऐकत नसेले तर जशास तसे उत्तर देण्याची तयारी देखील आम्ही केलेली आहे, असा इशारा त्यांनी दिला.

ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी अनेक नेत्यांवर केलेल्या आरोपानंतर पुण्यात ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष होते. मशिदीवरील भोंगे यासंदर्भात ते म्हणाले, अनेकदा सांगूनही ऐकू येत नसेल तर आमच्याही आरत्या तुम्हाला ऐकाव्याच लागतील. ३ मेनंतर देशभरातील हिंदूंनी सज्ज राहावे. आमच्या मिरवणुकीवर दगडफेक करून वातावरण बिघडवले जात असेल तर आमचे काय हात बांधलेले आहेत काय? असा सवाल ही त्यांनी केला. यानंतर आमच्या कोणत्याही मिरवणुकीवर दगडफेक झाली तर आमच्या हातात जे हत्यार येतील त्याचे वार तुम्हाला सहन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -