Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रवीज, कोळसाटंचाई हे तर नाटकच : गिरीश महाजन यांची टीका

वीज, कोळसाटंचाई हे तर नाटकच : गिरीश महाजन यांची टीका

राज्यात वीज आणि कोळशीची कृत्रीम  टंचाई करून जनतेच्या डोळ्यात अश्रु आणायचे मग ते पुसण्याचे नाटक करायचे, हा आघाडी सरकारचा डाव असून, जनतेने तो हाणून पाडला पाहिजे अशी बोचरी टीका भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. महाजन हे पुण्यात सोमवारी वैयक्तीक कामासाठी होते. त्यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी वीज, कोळसा टंचाई, राज ठाकरे यांची भूमिका, अशा विविध विषयावर त्यांनी मुक्त संवाद करीत आघाडी सरकारवर टीकेचे झोड उठवली.

महाजन म्हणाले की, राज्यात वीजेची टंचाई नसून, मागणी वाढली आहे. कारण उन्हाळा कडक आहे. शेतकऱ्यांना या कालावधीत पिकांना भरपूर पाणी लागते. तसेच सामान्य जनतेलाही भरपूर वीज लागते. मात्र आघाडी सरकार सहानुभुती मिळविण्यासाठी शेतकरी, सामान्य जनता आणि उद्योजकांचा छळ करीत आहे. ते कधी वीजेकडे तर कधी कोळसा टंचाईकडे बोट दाखवित आहेत. राज्य सरकारचे ढिसाळ नियोजनच यातून दिसते.

चढ्या दराने वीज खरेदी करायची आणि त्यात दलाली मिळवायची हा आघाडी सरकारचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. कोळशातही तेच सुरू आहे. कोळशाची टंचाई नसताना देखील 2 हजार मेगावॅटचे वीज केंद्र बंद करण्याचे नाटक सुरू आहे. राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही असेच वाटत आहे. ते दोन महिन्यापासून मंत्रालयात फिरले देखील नाहीत.

महाजन यांनी राज ठाकरे यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला बगल देत सांगितले की, ते स्वतंत्र पक्षाचे असून, भोंग्याच्या निर्बंधांबाबत सर्वेच्च न्यायालाने नियमावली ठरवून दिलेली आहे. त्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे. अॅसड. प्रविण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तुमच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांची नावे आहेत. या प्रश्नावर ते म्हणाले की, अॅिड. चव्हाण हे महाआघाडी सरकारचे एजंट असून, ते खुले आम कटकारस्थाने करताना सर्वांनी पाहिले. त्यांमध्ये त्यांना अटक करून सीआयडी ऐवजी सीबीआय चौकशी केली पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -