Wednesday, December 25, 2024
Homeब्रेकिंगपेट्रोल-डिझेलचे दर; वाढले की घटले जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे दर; वाढले की घटले जाणून घ्या

मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जाहीर करण्यात आले आहे. पेट्रोलिएम कंपन्यानी आज देखील सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या 6 एप्रिलपासून देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.


महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यातील इतर प्रमुख शहरात देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलिएम कंपन्यांनी मंगळवार, 19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने (IOCL) जारी केलेल्या नवीन दरानुसार, मुंबईत पेट्रोल 120 रुपये 51 पैसे प्रतिलिटर आणि डिझेल 104 रुपये 77 पैसे प्रतिलिटरप्रमाणे विक्री केले जात आहे. 

जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे इंधनाचे दर…

– मुंबईत आज पेट्रोल 120 रुपये 51 पैसे प्रतिलिटर आणि डिझेल 104 रुपये 77 पैसे प्रतिलिटर दराने विक्री केले जात आहे.
– ग्रेटर मुंबईत पेट्रोल 120 रुपये 63 पैसे आणि डिझेल 104 रुपये 88 पैसे प्रतिलिटर
– पुणे येथे पेट्रोल 120 रुपये 03 पैसे आणि डिझेल 102 रुपये 73 पैसे प्रतिलिटर.
– नाशिक शहरात पेट्रोल 120 रुपये 82 पैसे आणि डिझेल 103 रुपये 50 पैसे प्रतिलिटर.
– नागपूर शहरात पेट्रोल 120 रुपये 16 पैसे आणि डिझेल 102 रुपये 90 पैसे प्रतिलिटर.
-कोल्हापूर शहरात पेट्रोल 120 रुपये 61 पैसे आणि डिझेल 103 रुपये 32 पैसे प्रतिलिटर.

देशातील चार प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर…

– देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोल 105 रुपये 41 पैसे, तर डिझेल 96 रुपये 67 पैसे प्रतिलिटर विक्री होत आहे.
– देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोल 120 रुपये 51 पैसे प्रतिलिटर आणि डिझेल 104 रुपये 77 पैसे प्रतिलिटर दराने विक्री केले जात आहे.
– कोलकाता शहरात पेट्रोल 115 रुपये 12 पैसे तर डिझेल 99 रुपये 83 पैसे प्रतिलिटर.
– चेन्नई शहरात पेट्रोल 110 रुपये 85 पैसे तर डिझेल 100 रुपये 94 पैसे प्रतिलिटर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -