Thursday, March 28, 2024
Homeअध्यात्मआज आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या श्रीगणेशाची पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

आज आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या श्रीगणेशाची पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार 19 एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला एक विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थी ही गणेशाला समर्पित आहे आणि या दिवशी नियमानुसार गणपतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने श्रीगणेश आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी श्री गणेशाची पूजा महत्त्वाची मानली जाते. संकष्टीचा संस्कृत अर्थ त्रासदायक किंवा अडथळ्यांपासून मुक्ती असा आहे. त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो.

या महिन्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी 19 एप्रिल रोजी येत आहे. चतुर्थी मंगळवारी दुपारी 04:38 वाजता सुरू होईल आणि बुधवारी 20 एप्रिल रोजी दुपारी 01:52 पर्यंत सुरू राहील. या व्रतामध्ये संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर व्रत आणि पूजा पूर्ण मानली जाते. चंद्रोदयाची वेळ 19 एप्रिल रोजी रात्री 09:50 वाजता असेल.

संकष्टी चतुर्थी पूजा विधी 
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास करण्याचेही विशेष महत्त्व आहे. जर तुम्हीही संकष्टी चतुर्थीला पूजा किंवा उपवास करत असाल तर त्यासाठी पूजा विधी नक्की जाणून घ्या. 
 

• संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
• यानंतर गणेशाची पूजा करावी. गणेशाला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा आणि चंदन अर्पण करा.
• त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करून मंत्रांचा जप करावा.
• जे लोक या दिवशी उपवास करतात ते दिवसभर फक्त फळांचे सेवन करतात.
• संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणेशाची पूजा करा, व्रत कथा वाचा आणि श्रवण करा.
• यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून श्रीगणेशाला प्रसाद अर्पण करावा आणि उपवास सोडावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -