Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रघृणास्पद: युवकावर अनोळखी दोन इसमाकडून अनैसर्गिक अत्याचार

घृणास्पद: युवकावर अनोळखी दोन इसमाकडून अनैसर्गिक अत्याचार

खटाव तालुक्यातील विखळे फाटा येथील एका शिवारात एका युवकाला बळजबरीने मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पिडीत युवक हा द्राक्ष बागायतदार कामगार असून संशयित दोघे सांगली जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणात राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (दोघे रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोघांना वडूज पोलिसांनी रविवारी अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवक अमरावती जिल्ह्यातील द्राक्ष बाग कामगार असून, कलेढोण येथे द्राक्ष कंपनीमध्ये काम करत होता. त्याला कंपनीने कामावरून काढल्यानंतर तो युवक विखळे येथील एका बारमध्ये जाऊन मद्यपान करत बसला होता. त्याठिकाणी आलेल्या अनोळखी दोघांनी त्याची विचारपूस केली व त्यातून त्यांची ओळख झाली. त्यानंतर तिघांनी मिळून मद्यपान केले. त्यानंतर अनोळखी संशयितांनी तुला तुझे कंपनीकडून राहिलेले पैसे मिळवून देतो. तू आमच्या सोबत चल, असे बोलून त्या युवकाला सोबत घेतले.

कलेढोणकडे जाताना मध्येच रस्त्यात वाहन थांबवून त्याला मारहाण करीत अनैसर्गिक अत्याचार केला. युवकाला या घटनेने मानसिक धक्का बसला व त्याने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून संशयितांना तातडीने अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -