Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाIPL 2022: दिल्लीने 11 ओव्हरमध्ये पंजाबचा खेळ संपवला, DC चा मोठा विजय

IPL 2022: दिल्लीने 11 ओव्हरमध्ये पंजाबचा खेळ संपवला, DC चा मोठा विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

IPL 2022 मध्ये आज सर्वात एकतर्फी सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला (DC vs PBKS) सहज हरवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी पंजाब किंग्सला – 115 धावांवर रोखलं. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेवि वॉर्नरने जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने नऊ विकेट राखून हा सामना जिंकला.

वॉर्नर (David Warner) आणि शॉ ने वेगाने धावा जमवल्या. त्यामुळे 11 षटकातच दिल्लीने विजयी लक्ष्य गाठलं. दिल्लीने फक्त दोन पॉइंटच मिळवले नाहीत, तर त्यांच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. सहा सामन्यात त्यांचा हा तिसरा विजय आहे. पंजाबचा सात सामन्यातील चौथा पराभव आहे. दिल्लीकडून डेविड वॉर्नरने नाबाद 60, पृथ्वी शॉ ने 41 आणि सर्फराझ खानने नाबाद 12 धावा केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -